भारतात सोन्याच्या व्यवहारात विश्वासार्हतेचा अभाव – वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल

Courtesy: Social Media

भारतात सोन्याचं महत्त्व फक्त गुंतवणुकीपुरते नसून सोन्याला धार्मिक, पारंपरिक महत्वदेखील आहे. पण अजूनही भारतात सामान्य माणूस सोन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात गुंतवणूत करत नाही. याचे नेमके कारण काय आहे याचा शोध घेण्यासाठी वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने नुकतेच भारतात एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात सुमारे 2 हजारच्यावर नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यात ग्रामीण भागातील 1005 लोकांशी थेट तर शहरातील 1280 नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला.

सर्वेक्षणातील महत्त्वाचे निष्कर्ष

• या सर्वेक्षणातील 29 टक्के लोकांनी कधीही सोने खरेदी केली नसल्याचं सांगितले. पण भविष्यात सोने खरेदी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

• भविष्यात सोने खरेदी करण्याची इच्छा असलेल्या 61 टक्के लोकांनी सोने खरेदीचा व्यवहार विश्वासार्ह वाटत नसल्याची मुख्य अडचण असल्याचे सांगितले.

• 65 टक्के लोकांनी सोन्यामधील गुंतवणुकीविषयी शास्त्रीय माहिती नसल्याचे सांगितले. सोन्यामध्ये गुंतणूक करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, सोन्याच्या किमती नेमक्या कशावर ठरतात, ऐभारतात सोने खरेदीची प्रक्रियादेखील कठीण असल्याचे काहींनी सांगितले.

एकूणच भारतात सोन्याच्या व्यवसायात आणखी वृद्धी होऊ शकते, पण त्यासाठी आता या क्षेत्रात सुधारणांची गरज आहे.