पुण्यातील चर्चित असलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघातुन आम आदमी पक्षाचे डॉ. अभिजीत मोरे रिंगणात उतरले आहेत. चंद्रकांत पाटील या मतदार संघातून उभे असल्याने सर्व महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे आहे. मला आमदार का व्हायचंय? याविषयी बोलताना, “नागरिकांना आता हे सरकार नकोसे झाले आहे, कोथरूड मधील नागरिकांना बाहेरून आयात केलेला उमेदवार नकोय. कोथरूडकरांना POK (पाटील ऑक्युपाईड कोथरूड) मुक्त कोथरूड हवा आहे.” असा टोला लगावला आहे.
“दिल्ली मध्ये आम आदमी पक्षाने जो विकास केलायं तसाच विकास आम्हाला महाराष्ट्रात करायचा आहे. इतक्या वर्ष सरकार फक्त घोषणा करतय पण काम करत नाही. आम्हाला महाराष्ट्रात बदल घडवायचा आहे आणि नागरिक आम आदमी पक्षालाचं यावेळी निवडून देतील.” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
Updated : 15 Oct 2019 1:02 PM GMT
Next Story