महापरीक्षा पोर्टल पूर्णता बंद करण्यासाठी विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा

9

महापरीक्षा पोर्टल पूर्णता बंद करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्यावतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा व्हीनस कॉर्नर असेंबली रोड वरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महापरीक्षा पोर्टल पूर्णतः बंद करावं आणि रिक्त पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवावी. रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी. गट ‘ब’ आणि ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणे विभक्त पूर्व परीक्षा पद्धतीनं घ्यावी. पोलीस शिपाई पदासाठी पूर्वीप्रमाणेच चाचणी प्रथम आणि नंतर लेखी परीक्षा घेण्यात यावी या मागण्या विद्यार्थ्यांनी यांवेळी केल्या.

Comments