Home > News Update > कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत 'केनियन' दबदबा

कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत 'केनियन' दबदबा

कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत केनियन दबदबा
X

जणू वाऱ्याशी स्पर्धा करत यावर्षीची कोकण वर्षा मॅरेथॉन गाजवली ती केनियाच्या सारा केनिओ हिने. 11 किमीच्या खुल्या गट स्पर्धेत तिने "साऱ्यांना" मागे सारले.. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या त्या ज्योती गवते व अश्विनी जाधव या "परभणीकर मैत्रिणी"

तर 21 किमी खुल्या गटात मुलांमध्येही परभणीच्याच किरण म्हात्रे याने तर दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी "खांड एक्सप्रेस" ज्ञानेश्वर मोरघा आणि विजय मोरघा या "विक्रमगडकर मित्रांनी" बाजी मारली. त्यामूळे विशेष गाजलेली कोकण वर्षा मॅरेथॉन आता कोकणापुरती मर्यादित न रहाता आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन होऊ लागली आहे.

कोकणातील खेळाडुंना योग्य व्यासपीठ मिळावे आणि या स्पर्धेतून देशाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेडाळू मिळावेत यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. "एक धाव शिक्षण - आरोग्यासाठी" हे ब्रिदवाक्य असणाऱ्या या स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते. जेष्ठ पत्रकार व मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर, छत्रपती पुरस्कार विजेते कबड्डी खेळाडू नितीन मदने; महाराष्ट्र केसरी बाला रफिकजी शेख, प्रो कबड्डी खेळाडू निलेश शिंदे, माजी मुंबई पोलीस खेळाडू प्रशिक्षक शेखरजी पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोकण व कोकणाबाहेरून 6 हजार हुन अधिक स्पर्धकांनी हजेरी लावली होती. मुसळधार पाऊस कोकण वर्षा मॅरेथॉनची चांगलीच रंगत वाढवत होता.

खुला गट (मुले) 21 किमी

किरण म्हात्रे (प्रथम - परभणी)

ज्ञानेश्वर मोरघा (द्वितीय - विक्रमगड)

विजय मोरघा (तृतीय - विक्रमगड)

खुला गट (मुली) - 11 किमी

सारा केनिओ (प्रथम - केनिया)

ज्योती गवते (द्वितीय - परभणी)

अश्विनी जाधव (तृतीय - परभणी)

वयोगट 19 ; 11 किमी ( मुले )

संदिप पाल (प्रथम)

बाळू पुकरे (द्वितीय)

प्रमोद वळवी ( तृतीय)

वयोगट 19 ; 11 किमी (मुली)

निकिता पालकर (प्रथम)

अर्चना खुताडे ( द्वितीय)

प्रतिभा खुताडे (तृतीय)

वयोगट 17; 4 किमी

कविता दांगटे (प्रथम)

कुसुम घाटाळ ( द्वितीय)

निकिता मरले (तृतीय)

"केवळ सहा वर्षात कोकण वर्षा मॅरेथॉन साता - समुद्रापार पोहोचली आहे याचा आनंद आहे. यामुळे कोकणातील मुलांचाही कस लागणार असून तेही आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर स्पर्धा करतील आणि अधिकाधिक नवे खेळाडू कोकणच्या पुण्यभूमीत तयार होतील याची आम्हाला खात्री आहे."

Updated : 31 Aug 2019 5:23 PM GMT
Next Story
Share it
Top