Home > News Update > मंत्रीमंडळ निर्णय : कल्याण डोंबिवली मनपा हद्दीतून वगळलेल्या 18 गावांची नवी नगर परिषद

मंत्रीमंडळ निर्णय : कल्याण डोंबिवली मनपा हद्दीतून वगळलेल्या 18 गावांची नवी नगर परिषद

मंत्रीमंडळ निर्णय : कल्याण डोंबिवली मनपा हद्दीतून वगळलेल्या 18 गावांची नवी नगर परिषद
X

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वगळलेल्या 18 गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद करण्याच्या निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

वगळण्यात आलेली गावे पुढील प्रमाणे- घेसर, हेदूटणे, उंब्रोली, भाल, द्धारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उर्वरित 9 गावे पुढील प्रमाणे- आजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा. कोकण विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या अभिप्रायावरुन वरीलप्रमाणे स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय घेण्यात आला.

Updated : 18 March 2020 5:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top