Home > News Update > मध्य प्रदेशात 'ज्योती' कलश 'छल'के! ज्योतिरादित्य मोदींच्या भेटीला...

मध्य प्रदेशात 'ज्योती' कलश 'छल'के! ज्योतिरादित्य मोदींच्या भेटीला...

मध्य प्रदेशात ज्योती कलश छलके! ज्योतिरादित्य मोदींच्या भेटीला...
X

मध्यप्रदेशातील काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत प्रधानमंत्री निवास गाठला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण हे सुद्धा असल्याचं वृत्त आहे एकंदरीत या राजकीय घडामोडी पाहता मध्यप्रदेशातील काँग्रेस पक्षाच्या सत्तेचा बेरंग झाल्याचं स्पष्ट होत आहे.

मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता आली, तेव्हा ज्योतिरादित्य सिंधिया हे मुख्यमंत्रीपदाचे एक प्रबळ दावेदार होते; परंतु काँग्रेसमधील वरिष्ठांच्या दबावापुढे पक्षाचा काही चाललं नाही आणि कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. कमलनाथ यांनी सरकारच्या माध्यमातून राज्यावर चांगलीच पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला; परंतु काँग्रेस अंतर्गत कुरबुरी मात्र सुरू होत्या.

अलीकडे सीएए च्या निमित्ताने वेगळी वाट धरत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीचे संकेत दिले होते. सगळीकडे कोरोनाच्या साथीशी मुकाबला करण्यात जग गुंतलेलं असताना भाजपाने मध्यप्रदेशात आपला राजकीय खेळ साधला आहे. मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या 17 आमदारांनी राज्यपालाचे राजीनामे दिले आहेत, त्यामुळे तेथील काँग्रेस सरकार अल्पमतात आलं असून ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नव्या पक्षाच्या सोबतीने भाजपा सत्तेत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

आज माधवराव सिंधिया यांची आज 75 वी जयंती आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्योतिरादित्य आपल्या नव्या पक्षाची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Updated : 10 March 2020 6:25 AM GMT
Next Story
Share it
Top