Home > News Update > न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे संकेत

न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे संकेत

न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे संकेत
X

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूसंदर्भात सबळ पुरावे असतील तर या प्रकरणाची चोकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ते यशवंतराव चव्हाण सेंटर इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर बोलत होते.

न्यायमूर्ती लोया हे २००५मध्ये झालेल्या सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणाच्या खटल्याचे न्यायमूर्ती होते. या प्रकरणामध्ये गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री आणि आताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे नाव होते. त्यामुळे लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी अमित शहा यांचेदेखील जोडले गेले होते. या प्रकरणाची चौकशी पुन्हा करण्याची मागणी समोर आल्यास अमित शहा यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा...

अमेरिका-इराण संघर्ष- तुर्तास शांतता..

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा दबदबा कायम राहणार..

जस्टीस लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी होणार का? या संदर्भात आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रश्न विचारला तेव्हा यासंदर्भात कोणी तक्रार केली तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं म्हणत चौकशीचे संकेत दिले होते. पण त्यानंतर काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री नवाब मलिक यांनी जर सबळ पुरावे समोर आले या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं म्हटलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शरद पवार यांनी लोया प्रकरणाच्या चौकशीचे संकेत दिले होते. जस्टीस लोया प्रकरणी “लोकांची याविषयी चौकशी व्हावी अशी जर मागणी असेल तर या प्रकरणाचा नव्याने विचार व्हायला हवा, कोणी अशी मागणी करत असेल तर ती व्यक्ती कुठल्या आधारावर या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हाशी मागणी करत आहेत याचाही विचार करावा लागेल, पण या प्रकरणात तथ्य नसेल तर अशा प्रकारचे आरोप कोणावर लावणेही तितकेच चुकीचे आहे. “ असंही शरद पवार(Sharad Pawar) यांनी म्हटलं होतं.

१ डिसेंबर २०१४ रोजी न्या. लोया यांचं नागपूरमध्ये निधन झालं होतं. आपल्या सहकारी न्यायाधीशाच्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी न्या. लोया इतर दोन न्यायाधीशांसह नागपूरला गेले होते. पण तिथेच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यानंतर एका मासिकाने न्या. लोया यांचा मृत्यू संशयास्पदरीत्या झाला असल्याचे म्हटले होते. सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी न्या. लोया यांच्यासमोर सुरू होती. या प्रकरणात भाजपचे अध्यक्ष अमित शाह आरोपी होते. त्यामुळे न्या. लोयांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र, लोया यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूबद्दल कुणावरही संशय नसल्याचं सांगितलं होतं.

Updated : 9 Jan 2020 4:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top