Home > News Update > जळगाव महापालिका भाजप महापौर भारती सोनवणे यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल

जळगाव महापालिका भाजप महापौर भारती सोनवणे यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल

जळगाव महापालिका भाजप महापौर भारती सोनवणे यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल
X

जळगाव महापालिकाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांना धमकी तसंच शिवीगाळ केल्या प्रकरणी जळगाव महानगर पालिकेच्या महापौर भारती सोनवणे यांचे पती नगरसेवक कैलास सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MIDC पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात स्वच्छता तसंच रस्त्यांचे कामांबाबत अधिकारी आणि नगरसेवकांमध्ये वाद सुरू आहेत. शहरातील स्वच्छतेचा ठेका नाशिक येथील वॉटर गॅस कंपनीला देण्यात आला आहे. शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरून सत्ताधारी भाजप तसंच विरोधक शिवसेना यांच्यात रोज शाब्दिक युद्ध सुरु आहे.

स्वच्छतेचा ठेका दिलेल्या वॉटर गॅस कंपनी अधिकारी पदाधिकारी यांच्यामध्ये आर्थिक देवान घेवानीचा आरोप केला जात आहे. त्यातच उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांना भाजप चे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी धमकी तसंच शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसात दिली होती, पोलिसांनी कलम 294, 500, 506, 186 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Updated : 18 March 2020 3:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top