उद्धव ठाकरे फेल आहेत का?

अलिकडे राजकीय वर्तुळामध्ये उद्धव ठाकरे अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. अशा चर्चेला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यपालांना बैठक बोलावून सनदी अधिकाऱ्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा अधिकारशाहीवर वचक आहे का?

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस च्या लढाईत सर्वांनी सोबत काम करायला हवं असं सांगत असताना दुसरीकडे राज्यातील भाजप नेत्यांनी राज्यात ठाकरे सरकारविरोधात आज आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनामागील राजकीय गणित नक्की काय आहेत? यासंदर्भात मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक लोकमत चे सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्याशी केलेली खास बातचित…