इरफान खान काळाच्या पडद्याआड

इरफान खान काळाच्या पडद्याआड

बॉलिवूड अभिनेता इरफान खान चं कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झालं आहे. त्याची प्रकृती खराब झाल्यानं त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 53 व्या वर्षी त्याचं निधन झालं

2018 मध्ये इरफान खान ला कॅन्सर झाला होता. त्यानंतर त्याने लंडन येथे जाऊन उपचार घेतले होते. दोन वर्षांपासून तो न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त होता. (Bollywood Actor Irrfan Khan Passed away)

मात्र, त्याला colon infection चा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इरफान च्या अनेक चित्रपटातून सामाजिक विषयावर भाष्य करण्यात आले आहे.

‘चाणक्य’ या मालिकेद्वारे इरफानने मनोरंजन विश्वात त्यांनी पदार्पण केलं होतं. त्यानंतर चंद्रकांता, तसेच ‘द ग्रेट मराठा’ या मालिकांमध्ये त्याने भूमिका केली होती.  लाईफ ऑफ पाय, बिल्लू, हिंदी मिडीयम, पिकू, पानसिंग तोमर अशा दर्जेदार चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिकेत काम केले होते.