Home > News Update > INTERNATIONAL MEN’S DAY: पुरुषदिनाबद्दल काय म्हणतायत तृप्ती देसाई

INTERNATIONAL MEN’S DAY: पुरुषदिनाबद्दल काय म्हणतायत तृप्ती देसाई

INTERNATIONAL MEN’S DAY: पुरुषदिनाबद्दल काय म्हणतायत तृप्ती देसाई
X

आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस-19 नोव्हेंबर असे म्हटल्यावर अनेक जणांना धक्का बसला असेल परंतु हा दिवस साजरा करायला काय हरकत आहे? आपल्या जीवनात अनेक आदर्श पुरुष असतात त्यांचा सन्मान करणे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हरकत नाही.

कारण आपल्या जन्मानंतर आपले वडील, भाऊ, पती तसेच काही पुरुष, महिलांकडे ज्यांचा बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आहे. तसेच महिलेने घेतलेल्या प्रत्येक भरारीला जे चांगली दाद देतात ते आपल्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखात आपली कायम साथ देतात त्यांना नक्कीच आपण या दिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात.

मर्द का दर्द

आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे किंबहुना महिलांना दुय्यम स्थान असल्यामुळे जगात महिला दिनाची सुरुवात झाली असावी. त्यामुळे 8 मार्च ‘जागतिक महिला दिन’ सगळीकडे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

अजूनही असणारी पुरुषी मानसिकता महिलांवर होणारे अत्याचार व्यसनाधीनता यांसारख्या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायचा का, नाही? हा प्रश्नच आणि का सफर पडतो परंतु अशा घटनांवर सुद्धा परिवर्तन करायचे असेल तर पुरुषांचाही सन्मान करून त्यांचे मत परिवर्तन होऊ शकते.

ज्या महिला आज प्रगतीपथावर आहेत. नक्कीच त्यांच्या मागे एक आदर्श पुरुष असतातच माझे सुधारण घेतले तर स्त्री-पुरुष समानतेसाठी जुन्या रूढी परंपरांच्या विरोधात लढताना अनेक हल्ले शिवीगाळ विरोध चारित्र्यहनन याला सामोरे जावे लागले पण तिथे खंबीरपणे साथ दिली माझ्या पतीने.

त्यामुळे आज इतिहास घडला त्याच बरोबर अनेक पुरुषी क्रांती घडविताना माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले तर सर्वांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा आणि त्यांना सलामसुद्धा.

हा दिवस 30 देशांमध्ये साजरा केला जातो. चला आता आपण ही मोठ्या मनाने आदर्श पुरुषांचा सन्मान करूया.

Updated : 19 Nov 2019 12:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top