Home > News Update > पत्रकार प्रशांत कांबळेंना इंटक संस्थापक महात्मा गांधी राज्यस्तरीय गौरव पत्रकारीता पुरस्कार जाहीर

पत्रकार प्रशांत कांबळेंना इंटक संस्थापक महात्मा गांधी राज्यस्तरीय गौरव पत्रकारीता पुरस्कार जाहीर

पत्रकार प्रशांत कांबळेंना इंटक संस्थापक महात्मा गांधी राज्यस्तरीय गौरव पत्रकारीता पुरस्कार जाहीर
X

मुंबई : देशभरातील कामगारांच्या प्रश्नांवर रान उठवणाऱ्या इंटक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत 25 फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहे. यामध्ये कामगारांच्या प्रश्नांवर सडेतोड निःपक्ष लिखाण करणारे मुंबई सकाळ चे प्रतिनिधी प्रशांत कांबळे यांना इंटक संस्थापक महात्मा गांधी राज्यस्तरीय गौरव पत्रकारीता पुरस्कार 2020 या पहिल्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. इंटकचे राज्य अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.

पत्रकारितेचा खडतर प्रवास

प्रशांत कांबळे अमरावती जिल्ह्यातील संत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमितील छोट्याश्या शिरजगाव मोझरी गावातील मूळ रहिवासी आहे. विद्यार्थी चळवळीपासून ते पत्रकारीपर्यंतचा त्यांनी खडतर प्रवास केला आहे. सामान्य जनता, शोषित कामगार, सफाई कामगार यांच्या ज्वलंत प्रश्न त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सरकारी दरबारी मांडले आहे. त्यांच्या पत्रकारितेमुळे अनेकांना न्याय मिळाला असून राज्य शासनाने सुद्धा त्यांच्या पत्रकारितेची दखल घेत पू ल देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाहिनी राज्यस्तरीय पुरस्कार 2014 आणि 51 हजार मानधन अशा पुरस्काराने यापूर्वी गौरविण्यात आले आहे.

त्यामुळे कामगारांच्या समस्यांवर त्यांच्या उल्लेखनीय लिखाणासाठी इंटक संघटनेच्या वतीने यावर्षी पहिल्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, पहिल्याच पुरस्काराचे मानकरी पत्रकार प्रशांत कांबळे ठरले आहे. तर यानंतर दरवर्षी पाच पुरस्काराची घोषणा यानंतर केली जाणार असल्याचे छाजेड यांनी सांगितले आहे.

यावेळी इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डाॅ.जी. संजीवा रेड्डी कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहे. तर महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, परिवहन व गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एकनाथराव गायकवाड यांची उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Updated : 23 Feb 2020 5:56 PM GMT
Next Story
Share it
Top