मराठी उद्योजकाने सुरु केला अभिनव उद्योग

सामान्य मराठी माणसाचा नेहमी एक न्यूनगंड असतो की तो व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही. मराठी लोकं नोकऱ्यांच्या शोधातच अधिक दिसतात. मराठी उद्योजक उद्योगापासून चार हात दूरच झालेले दिसतात. मात्र, ग्रामीण भागातल्या एका जिद्दी तरूणानं ही सर्व गृहितकं खोटी ठरवतं उद्योगभरारी घ्यायला सुरूवात केलीय.

ग्रामीण भागातून येऊन शहरात उद्योजक म्हणून जम बसवणं सोप्प नक्कीच नसतं. मात्र, संदीप सानप यानं सॉफ्टवेअर सर्व्हिसेस च्या उद्योगात यशस्वी भरारी घेतलीय. मराठी उद्योजक आणि मानसिकता यासंदर्भात स्वतः संदीप सानप यांच्याकडूनच जाणून घेऊयात. आपल्याकडील कौशल्याचा योग्य वापर केल्यास कुठल्याही व्यवसाय, उद्योगात हमखास यश मिळतंच, असा मौलिक सल्ला सानप देतात.