Home > News Update > रावसाहेब दानवे - गिरीश महाजन यांच्यासमोर शाईफेक

रावसाहेब दानवे - गिरीश महाजन यांच्यासमोर शाईफेक

रावसाहेब दानवे - गिरीश महाजन यांच्यासमोर शाईफेक
X

जळगावमधील भाजप जिल्हाध्यक्ष पदाच्या निवड बैठकीत कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी झाल्यामुळे गालबोट लागले आहे. बैठकीत भुसावळ तालुका अध्यक्ष निवडीच्या विषयावरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी काही आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अंगावर शाई फेकली. बैठकीत झालेला वाद पाहून रावसाहेब दानवे यांनी सभागृहातून काढता पाय घेतला.

भाजपच्या पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रमांतर्गत आज जळगाव जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात येणार होती. यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर भुसावळ येथील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी भुसावळ तालुका अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय उपस्थित करत रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्याची विनंती केली.

नेत्यांनी निवेदन स्वीकारण्यास अनुमती दिल्यानंतर काही कार्यकर्ते व्यासपीठाच्या दिशेने गेले. यावेळी भुसावळ येथील दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने कार्यकर्ते आपसात भिडले. काही कळायच्या आत काही अज्ञात कार्यकर्त्यांनी थेट रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्या दिशेने शाही फेकली. या गोंधळात जळगाव जिल्हा भाजपतील एका पदाधिकाऱ्याच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले.

Updated : 10 Jan 2020 11:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top