Home > News Update > ‘ज्या शासनाला स्वत:चे जीआर टिकवता येत नाही, त्या शासनाचा उपयोग काय?’

‘ज्या शासनाला स्वत:चे जीआर टिकवता येत नाही, त्या शासनाचा उपयोग काय?’

‘ज्या शासनाला स्वत:चे जीआर टिकवता येत नाही, त्या शासनाचा उपयोग काय?’
X

सध्या मराठा समाजातील 4 ते 5 वर्षापासून एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुंलीवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. या मुली गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. यातील काही मुली मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेल्या. मात्र, या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली.

मराठा समाजातील एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलींवर अभ्यास करुन नोकरी मिळवून देखील बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने १९ डिसेंबर २०१८ ला घेतलेला शासन निर्णय २०१७ च्या राज्यसेवा (एमपीएससी) परीक्षांना लागू केला आहे. त्यामुळे पूर्वलक्ष्यी प्रभावाने ४०० महिला उमेदवार या प्रक्रियेतून बाहेर पडल्या आहेत.

२०१७ च्या राज्यसेवेची जाहिरात असलेल्या पदांना ऑगस्ट २०१४ चा अध्यादेश लागू असतानाही सरकारने नंतरचा अध्यादेश चुकीच्या पद्धतीने लागू केला आहे. यामुळे माझा संसार तुटायची वेळ आली आहे. मिस्टर आर्मीत आहेत. मी 4 ते 5 वर्षांपासून अभ्यास करते. असं म्हणत एका एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलीने आपली व्यथा मॅक्समहाराष्ट्र समोर व्यक्त केली.

https://youtu.be/Cx7to-OOkQ0

Updated : 12 Sep 2019 6:15 AM GMT
Next Story
Share it
Top