Home > News Update > भारताचे २९ वे लष्करप्रमुख मराठमोळे मुकुंद नरवणे, आत्तापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख तुम्हाला माहिती आहेत का?

भारताचे २९ वे लष्करप्रमुख मराठमोळे मुकुंद नरवणे, आत्तापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख तुम्हाला माहिती आहेत का?

भारताचे २९ वे लष्करप्रमुख मराठमोळे मुकुंद नरवणे, आत्तापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख तुम्हाला माहिती आहेत का?
X

भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून मुकुंद नरवणे 1 जानेवारीपासून बिपीन रावत यांच्या जागेवर पदभार सांभाळणार आहेत. लष्करप्रमुख बिपीन रावत आज सेवानिवृत्ती होत असून नरवणे हे पुढील पदाचे सूत्र हाती घेणार आहेत.

मनोज नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहे. नरवणे हे जून १९८० ‘७ सीख लाईट इन्फंट्री’ मधून लष्करात भरती झाले. जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या कारावाया हुलकून लावण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे प्रतिनिधीत्व त्यांनी केलं. त्याचप्रमाणे स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग ’लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, राष्ट्रीय रायफल्सचे नेतृत्व तसेच महूस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांवर काम त्यांनी यशस्वीपणे केलं आहे.

नरवणे यांचे आईवडील दोघेही निवृत्त अधिकारी आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपणा प्रत्येक ठिकाणी सिद्ध केला होता.

आत्तापर्यंत कोणी-कोणी पार पाडली लष्करप्रमुखाची जबाबदारी पाहा

क्रमांकनाव वर्ष
1जनरल रॉबर्ट लॉकहार्ट15 Aug 1947 – 31 Dec 1947
2जनरल सर रॉय बुचर01 Jan 1948 – 15 Jan 1949
3फिल्ड मार्शल के.एम करिप्पा 16 Jan 1949 – 14 Jan 1953
4जनरल के.स राजेंद्र सिंहजी 15 Jan 1953-14 May 1955
5जनरल एस.एम श्रीनागेश 15 May 1955-7 May 1957
6जनरल के.एस थिमय्या 8 May 1957-7 May 1961
7जनरल पी.एन थापर8 May 1961-19 November 1962
8जनरल जे.एन 20 November 1962-7 June 1966
9जनरल पी.पी कुमारामंगलम8 June 1966-7 June 1969
10 फिल्ड मार्शल एसं.एच.एफ.जे8 June 1969-15 January 1973
11जनरल जी.जी बेवर 16 January 1973-31 May 1975
12जनरल टी.एन रैना1 June 1975-31 May 1978
13जनरल ओ.पी मल्होत्रा1 June 1978-31 May 1981
14जनरल के.वी राव 1 June 1981-31 July 1983
15जनरल ए.एस वैद्य1 August 1983-31 January 1986
16जनरल के.ए,एस सुंदरजी1 February 1986-31 May 1988
17जनरल वि.एन शर्मा1 May 1988-30 June 1990
18जनरल एस.एफ रोड्रीग्स 1 July 1990-30 June 1993
19जनरल बी.सी जोशी1 July 1993-19 November 1994
20जनरल एसं रॉय चौधरी22 November 1994-30 September 1997
21जनरल वि.पी मलिक1 October 1997-30 September 2000
22जनरल एस पद्मभान1 October 2000- 31December 2002
23जनरल एन.सी विज31 December 2002 - 31 January 2005
24जनरल जे.जे सिंग01 February 2005 - 30 September 2007
25जनरल दिपक कपुर30 September 2007-30 March 2010
26जनरल वि.के सिंग31 March 2010 - 31 May 2012
27जनरल बिक्रम सिंग01 June 2012 - Incumbent
28.जनरल बिपीन रावत 31 December 2016 to 31 December 2019
29. मनोज मुंकूट नरवणे1 January, 2020-incumbent

Updated : 31 Dec 2019 5:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top