देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 30 हजार 152

Courtesy: Social Media

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे नवीन 3 हजार 970 रुग्ण आढळले असून देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता 85 हजार 940 झाली आहे. तर 103 रुग्णांचा 24 तासात मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 2 हजार 752 झाली आहे. 30 हजार 152 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने देशातील कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या 53 हजार 35 आहे.

कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण 3 ते 4 टक्क्यांच्या जवळपास आहे. दरम्यान देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून आता राज्यातील रुग्णसंख्या 30 हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. तर त्यानंतर तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमधील रुग्ण संख्या आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 40 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.