देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 82 हजारांच्या जवळ
Max Maharashtra | 15 May 2020 10:45 AM IST
X
X
तिसऱ्या लॉकडाऊनची मुदत संपत आली असताना देशातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता 82 हजारांच्या जवळ येऊन ठेपली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार 24 तासात देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 967 ने वाढली आहे. त्यामुळे आता देशातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 81 हजार 970 वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात 100 कोरोनाबाधीत रुग्णांचा देशभरात मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 2 हजार 649 वर पोहोचली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 27 हजार 524 वर पोहोचली आहे. आता देशात सध्या 51 हजार 401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून ही संख्या आता 27 हजारांच्यावर पोहोचली आहे. त्यानंतर तामिनळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
Updated : 15 May 2020 10:45 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire