24 तासात देशात कोरोनाचे 4 हजार 213 नवीन रुग्ण

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आता संपण्याच्या जवळपास आला असताना देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता आणखी वाढली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 213 ने वाढली आहे. त्यामुळे आता रुग्णांची एकूण संख्या 67 हजार 152 वर पोहोचली आहे.

पण दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 210 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. तर मृतांची संख्या वाढून आता 2 हजार 206 झाली आहे. देशात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून आता हे प्रमाण 30 टक्क्यांवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन करणार असून त्यानंतर लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.