कोरोनाचे संकट – देशात 24 तासात 1 हजार 975 नवीन रुग्ण

देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 975 ने वाढली असून आता एकूण रुग्णांची संख्या 26 हजार 917वर पोहोचली आहे. 24 तासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.

तर आतापर्यंत 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 24 तासात 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 119 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आता बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 913वर पोहोचली आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येने 8 हजारांचा टप्पा पार केला आहे.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. तर आतापर्यंत राज्यात 342 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या मुंबईत कोरोनाचे 5 हजार 400 रुग्ण आहेत. देशात महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण हे गुजरातमध्ये आहेत. इथं सध्या 3071 रुग्ण आहेत. तर दिल्लीत 2625 रुग्ण आढळलेले आहेत.