रेल्वे खासगीकरणाच्या रुळावर, सरकारचे पहिले पाऊल

रेल्वे क्षेत्रात खासगी गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारने आता प्रस्ताव मागवले आहेत. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली आहे. 109 मार्गांवर खासगीकरणाच्या माध्यमातून प्रवासी रेल्वे ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. यामध्ये 30 हजार कोटींची खासगी गुंतवणूक होईल असा सरकारचा अंदाज आहे.

रेल्वेचे देशभरात 12 विभाग करण्यात आले असून या माध्यमातून खासगी गुंतवणुकीद्वारे ट्रेन चालवल्या जाणार आहेत. 16 डब्यांच्या या ट्रेन असतील. यातील बहुतांश रेल्वे गाड्या या भारतातच तयार केल्या जाणार आहेत. पण रेल्वे गाड्यांची देखभाल, गाड्या चालवणे, त्यासाठीचा खर्च, हे सर्व खासगी गुंतवणुकारांनाच करावे लागणार असल्याचे रेल्वेनं स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा..

प्रवासाचा वेळ कमी व्हावा यासाठी रेल्वेचा वेग प्रतिसाद 160 किलोमीटर ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. रेल्वे प्रवास अधिक सुखकर व्हावा, जास्तीत जास्त रोजगार निर्माण व्हावा, रेल्वेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

पण या ट्रेन रेल्वेचे गार्ड आणि ड्रायव्हरमार्फतच चालवले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here