Home > News Update > अमर रहे...अमर रहे....बीडमध्ये शहीद जवानाला अखेरचा निरोप !

अमर रहे...अमर रहे....बीडमध्ये शहीद जवानाला अखेरचा निरोप !

अमर रहे...अमर रहे....बीडमध्ये शहीद जवानाला अखेरचा निरोप !
X

संपूर्ण देश नवीन वर्षाचं स्वागत करत असताना देशाच्या सीमेवर राज्यातील दोन जवानांना वीरमरण आलंय. बीड जिल्ह्यातील महेश तिडके आणि सातारा जिल्ह्यातील संदीप जाधव या जवानांनी देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलंय.

महेश तिडके हे पंजाबमधील भटिंडा इथं सेवा बजावत होते. शहीद महेश तिडके हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील लाडझरी या गावाचे सुपुत्र आहेत. आज त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी लष्करी इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसागर लोटला होता.

"अमर रहे अमर रहे वीरजवान अमर रहे" अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तर सातारा जिल्ह्यातील संदीप जाधव या शहीद जवानाच्या पार्थिवावरही आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संदीप जाधव यांना नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले आहे.

Updated : 2 Jan 2020 6:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top