Home > News Update > लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार रे भाऊ?

लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार रे भाऊ?

लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार रे भाऊ?
X

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार नागरिकांवर काही बंधन आली आहेत. अनेक लोक दुकानांच्या बाहेर रांगा लावत आहेत. अनेक लोकांना असं वाटतंय की, उद्यापासून सर्व सुविधा बंद होणार आहेत. त्यामुळं नक्की काय बंद राहणार आणि काय सुरु राहणार हे समजून घेणं महत्वाचं आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व जीवनावश्यक सुविधा या दरम्यान सुरु राहणार आहेत.

1)किमान मनुष्यबळासह शासकीय लेखा व कोषागरे आणि संबंधित कार्यालये, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये सुरु राहणार आहेत.

2. किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्अल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या सुरु राहतील.

3. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं सुरु राहतील

4. टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यासह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा सुरु राहतील.

5. अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक व्यवस्था सुरु राहतील

6. शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात सुरु राहील

7. बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ, कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन, साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.

8. खाद्य पदार्थ, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण सुरु राहील

9. खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक सुरु राहतील.

10. बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा

11 उपाहारगृहांमधून घरपोच सेवा सुरु राहतील

12. औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखादय, चारा निर्मिती घटक, इत्यादी

13. रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक सुरु राहील.

14. पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था

15. टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा सुरु राहतील.

16. पावसाळयापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामं शेतकरी करु शकतील.

Updated : 24 March 2020 6:32 PM GMT
Next Story
Share it
Top