Home > Election 2020 > पश्चिम बंगालमध्ये प्रचारबंदीवर काँग्रेस नाराज

पश्चिम बंगालमध्ये प्रचारबंदीवर काँग्रेस नाराज

पश्चिम बंगालमध्ये प्रचारबंदीवर काँग्रेस नाराज
X

ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड, अमित शहा यांच्या रॅली दरम्यान झालेला हिंसाचार यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधला प्रचार एक दिवस आधी संपवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय म्हणजे लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रीया राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे.

झालेल्या हिंसाचाराबद्दल निवडणूक आयोग अमित शहा यांना का नोटीस पाठवत नाही?

असा सवाल ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे, तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अमित शहा यांनी देखिल पश्चिम बंगालमध्ये लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला आहे.

पश्चिम बंगालमधला प्रचार आज रात्री संपुष्ठात येणार आहे, आचारसंहितेनुसार प्रचार शुक्रवारी ५ वाजेपर्यंत करता येतो. मात्र, निवडणूक आयोगाने तो गुरूवारी रात्रीच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ पंतप्रधानांच्या रॅलींना अडथळा होऊ नये म्हणून रात्री प्रचार संपवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Updated : 16 May 2019 4:47 AM GMT
Next Story
Share it
Top