Home > News Update > देशातील रुग्णसंख्या अडीच लाखांच्यावर, भारत टॉप ५ देशांच्या यादीत

देशातील रुग्णसंख्या अडीच लाखांच्यावर, भारत टॉप ५ देशांच्या यादीत

देशातील रुग्णसंख्या अडीच लाखांच्यावर, भारत टॉप ५ देशांच्या यादीत
X

कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या सोमवारी ९ हजार ९८३ एवढी नोंदवली गेल्याने आतापर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार ६११ एवढी झाली आहे.

तर २४ तासात २०६ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने एकूण कोरोना बळींची संख्या ७ हजार १३५ झाली आहे. दरम्यान

एकूण रुग्णांपैकी १ लाख २४ हजार ९४ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सध्या एक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या १ लाख २५ हजार ३८१ एवढी आहे. दरम्यान जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार जगातील कोरोनाबाधीत देशांच्या यादीत भारत आता पहिल्या पाच देशांमध्ये आला आहे.

भारताच्या पुढे आता ब्रिटन, रशिया, ब्राझील आणि अमेरिका हे देश आहेत.

Updated : 9 Jun 2020 1:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top