भारत चीन मध्ये चर्चेला सुरुवात, चर्चेची सूत्र अजित डोवाल यांच्याकडे

गलवान खोऱ्यामधून चीनने आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केल्याचे वृत्त ए एन आय या वृत्तसंस्थेने दिले आहे. सोमवारी या प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी रविवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली या चर्चेनंतर चीनने माघार घेतल्याचे बोलले जात आहे

लडाखमध्ये भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने ४ ठिकाणांहून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे. प्रत्यक्ष ताबा रेषा जवळून भारत आणि चीन या दोन्ही देशांनी परस्पर सामंजस्याने आपापले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे असे देखील या वृत्तात म्हटले आहे.

यात गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉईंट क्रमांक 14 आणि 15, हॉट स्प्रिंग आणि फिंगर एरिया या चार ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे. एक ते दोन किलोमीटरपर्यंत सैन्य दोन्ही बाजूने मागे घेतले जात असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिल्याचे देखील या वृत्तात म्हटलेलं आहे. गलवानमध्ये चीनबरोबर झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि चीनदरम्यान लष्करी लष्करी पातळीवर चर्चा सुरु झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here