देशभरात 24 तासात 1 लाखांच्यावर लोकांची कोरोना तपासणी

Courtesy: Social Media

देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी 6 हजारांनी वाढल्याने आता कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 25 हजार 101 झाली आहे. पण 51 हजार 784 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याने आता एक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 69 हजार 597 आहे.

तर देशात गेल्या 24 तासात 137 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळींची संख्या 3 हजार 720 झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 1 लाख 15 हजार 364 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 28 लाख 34 हजार 798 लोकांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली आहे.