Home > News Update > देशात कोरोनाबाधीत रुग्णांपैकी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५० टक्क्यांच्या जवळ

देशात कोरोनाबाधीत रुग्णांपैकी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५० टक्क्यांच्या जवळ

देशात कोरोनाबाधीत रुग्णांपैकी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५० टक्क्यांच्या जवळ
X

गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत (covid 19) रुग्णांची संख्या ९ हजार ९८७ एवढ्या विक्रमी संख्येने वाढली आहे. तर गेल्या २४ तासात ३३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ६६ हजार ५९८ झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या ७ हजार ४६६ झाली आहे. एकूण कोरोनाबाधीत (covid 19) रुग्णांपैकी आतापर्यंत १ लाख २९ हजार २१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हे ही वाचा

कोरोनाशी लढा- पुणे जिल्ह्यासाठी केंद्रीय पथकाच्या या सूचना

#कोरोना योद्धा : गंभीर आजार आणि १२ दिवस व्हेंटिलेटर, तरीही रुग्ण कोरोनामुक्त

एकाच दिवसात १६६१ रुग्ण कोरोनामुक्त

तर १ लाख २९ हजार ९१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासात देशात १ लाख ४१ हजार ६८२ लोकांची कोरोना (covid 19) चाचणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशात एकूण ४९ लाख १६ हजार ६१६ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Updated : 9 Jun 2020 5:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top