देशात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ

Courtesy: Social Media

देशात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारांनी वाढली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. 24 तासात देशात 5 हजार 611 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 6 हजार 750 वर पोहोचली आहे.

तर आतापर्यंत 42 हजार 298 रुग्ण कोरोनामधून मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 104 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याने देशातील कोरोना बळींची संख्या 3 हजार 303 झाली आहे. दरम्यान देशभरात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून ही संख्या आता 37 हजारांच्यावर पोहोचली आहे. तर त्यानंतर तामिळनाडू, गुजरात आणि दिल्ली या राज्यांचा क्रमांक आहे. 42 हजार 298 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याने देशातील एक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या 61 हजार 149 वर आहे.