देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ६० हजारांच्या उंबरठ्यावर

Courtesy: Social Media

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण तरीही देशात गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३ हजार ३२०ने वाढली आहे. तर ९५ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ५९ हजार ६६२वर पोहोचली आहे.

तर एकूण मृतांची संख्या १ हजार ९८१ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १७ हजार ८४७वर पोहोचली आहे. तर देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून त्यांनतर गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.