दिलासादायक – देशात 24 तासात 3 हजार रुग्ण कोरोनामुक्त

Courtesy: Social Media

देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता दररोज सुमारे 5 हजारांनी वाढत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने गुरूवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात 5 हजार 600 नवीन रुग्ण आढळल्याने देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 12 हजार 358 झाली आहे.

पण दिलासादायक बाब म्हणजे 24 तासात कोरोनाचे 3 हजार 2 रुग्ण बरे झाल्याने देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 45 हजार 299 झाली आहे. त्यामुळे आता देशात 63 हजार 624 एक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या 3 हजार 435 झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार देशातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 3.6 टक्के एवढेच आहे तर जागतिक पातळीवरील मृत्यू दर हा 6.65 टक्के एवढा आहे.

कोरोनाबाधीत रुग्णांच्याबाबतीत ही आकडेवारी वाचा

• देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 64 टक्के पुरूष तर 36 टक्के महिला

• 15 वर्षांखालील मृत रुग्ण – 0.5 टक्के

• 15 ते 30 वयोगटातील मृत रुग्ण – 2.5 टक्के

• 30 ते 45 वयोगटातील मृत रुग्ण – 11.4 टक्के

• 45 ते 60 वयोगटातील मृत रुग्ण – 35. 1 टक्के

• 60 वर्षांवरील मृत रुग्ण – 50 .5 टक्के

• 73 टक्के मृत व्यक्तींना इतर आजार