देशभरात 24 तासात 1538 रुग्ण कोरोनामुक्त

Courtesy: Social Media

गेल्या 24 तासात देशात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत 3 हजार 604 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता 70 हजार 756 वर पोहोचली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 1 हजार 538 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 22 हजार 455 वर पोहोचली आहे.

तर गेल्या 24 तासात 87 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोना बळींची संख्या 2 हजार 293 वर पोहोचली आहे. पण एकूण रुग्णांच्या तुलनेत देशातील कोरोना बळींच्या संख्येचे प्रमाण 3.2 टक्के एवढेच आहे.

तर कोरोनाच्या रुग्णांच्या दुपटीने वाढीचा वेगही आता आणखी मंदावला असून गेल्या ३ दिवसात तो 12.2 आला आहे. गेल्या 14 दिवसात हा वेग 10.9 होता. तर कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढून आता 31.74 टक्क्यांवर पोहोचले आहे.