Home > News Update > ऑनलाईन पेमेंट करताय? मग हा धोका लक्षात घ्या !

ऑनलाईन पेमेंट करताय? मग हा धोका लक्षात घ्या !

ऑनलाईन पेमेंट करताय? मग हा धोका लक्षात घ्या !
X

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, इंटरनेटचा वापर वाढला आहे. पण काही गुन्हेगार याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४७५ गुन्हे दाखल झाले असून २५६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

डेबिट व क्रेडिट कार्ड वापर

सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर भामटे वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करून सामान्य नागरिकांना फसवित आहेत . कधी ते नागरिकांना खोट्या ऑफर्सच्या मोहात पाडून एखादे मोबाईल अँप डाउनलोड करायला लावतात व त्यांच्या फोनचा ताबा मिळवतात . तर कधी sms किंवा ई-मेल करून एखाद्या बक्षिसाचे आमिष दाखवून नागरिकांना एखद्या लिंकवर क्लिक करायला लावतात व त्यातून सर्व वैयक्तिक माहिती व बँक खात्याची माहिती घेऊन फसवतात.

हे ही वाचा..

“ऑनलाईन शिक्षणासाठी ग्रामीण भागात इंटरनेट आणि स्मार्ट फोन मोफत द्या”

ऑनलाईन शाळांचे तास कमी होण्याची शक्यता

राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५० हजारांपर्यंत

मृत्यू विषयी चिंतनातून करोना विषाणू सोबत जगण्याची उमेद – अ‍ॅड. असीम सरोदे

इंटरनेट वापरताना ही काळजी घ्या

१. आपल्या सोशल मिडिया अकाउंटचा पासवर्ड,इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड ,आपले डेबिट व क्रेडिट कार्डसचे पिन क्रमांक, CVV क्रमांक, ईमेलचे पासवर्ड, UPI, Paytm इत्यादी मोबाईल wallet चे पिन नंबर कोणाला देऊ नका.

२. शक्यतो प्रत्येक नेट बँकिंग अकाउंटचा पासवर्ड वेगळा ठेवा

३. कोणत्याही व्यक्तीने एखादे नवीन किंवा अनोळखी मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करायला सांगितले तर शक्यतो तसे करणे टाळा

४.तुम्हाला sms किंवा इमेलवर येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लीक करून आपली सर्व माहिती कुठेही देऊ नका.

५. जर काही औषध किंवा खाण्याचे पदार्थ ऑनलाईन ऑर्डर करणार असाल तर शक्यतो Cash on delivery चा पर्याय निवडा.

६. जर वेबसाईटवर क्लिक करणार असाल तर ती वेबसाईट https या पासून सुरु होत असेल व त्याचा डाव्या बाजूला बंद कुलुपाची खूण असेल तर ती वेबसाईट शक्यतो फेक नसते.

७. कुठल्याही paytm, UPI किंवा तत्सम wallet मधून एक रुपया ट्रान्सफर करायचे transaction करू नका

८. कोणतीही payment wallet कंपनी त्यांच्या ग्राहकांचे KYC (Know Your Customer) documents फोनवर अपडेट करत नसते.

९. नागरिकांनी हे पण लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे आहे कि तुमच्या खात्यात जर काही रक्कम जमा होणार असेल तर त्यासाठी कोणी OTP मागत नसतो.

Updated : 14 Jun 2020 2:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top