Home > News Update > ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये किती पाऊस पडणार? हवामान विभागाने वर्तवला नवा अंदाज

ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये किती पाऊस पडणार? हवामान विभागाने वर्तवला नवा अंदाज

ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये किती पाऊस पडणार? हवामान विभागाने वर्तवला नवा अंदाज
X

देशभरात जूनमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर सर्वत्र दमदार पाऊस झाला. पण जुलै महिन्यात बहुतांश भागात पुरेसा पाऊस पडला नसल्याने यंदा पावसाने जुलैमधील सरासरी गाठलेली नाही. पण आता मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा सुधारीत अंदाज भारताच्या हवामान विभागाने शुक्रवारी वर्तवलेला आहे. ऑगस्टमध्ये सरासरीच्या 97 टक्के पाऊस होईल.

पण सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 104 टक्क्यांपर्यंत पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान जुलैमध्ये सरासरीच्या 10 टक्के पाऊस कमी पडला असला तरी जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने या दोन महिन्यात एकूण सरासरीएवढा पाऊस झालेला आहे. पण ला निओच्या परिणामामुळे सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने एप्रिल महिन्यात वर्तवलेल्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०० टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता हवामान विभागाने मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील (ऑगस्ट ते सप्टेंबर) महिन्याचा अंदाज जाहीर केला आहे. ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सर्वसाधारण पाऊस मानला जातो. दरम्यान जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्याने राज्यातील बहुतांश धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठी झालेला नाही. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या काही धरणांमध्येही गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाण्याचा साठा झाला आहे.

Updated : 1 Aug 2020 2:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top