Home > News Update > अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे, बहिणीनं व्यक्त केली इच्छा

अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे, बहिणीनं व्यक्त केली इच्छा

अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे, बहिणीनं व्यक्त केली इच्छा
X

रक्षाबंधना निमित्त अजित पवार यांच्या बहिण डॉ. रजनी इंदुलकर यांनी एका मुलाखत देताना

त्यांचे काका शरद पवार यांना एकदिवस पंतप्रधान झालेले पाहायचे आहे. आणि अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. अशी इच्छा व्यक्त केली आहे.

काय म्हणाल्या डॉ. रजनी इंदुलकर...

"दादा तुम्ही सगळ्यांसाठी, फक्त आमच्यासाठी नाही, तर समस्त कार्यकर्त्यांसाठी, न ओळखीच्या माणसांसाठी, लाखो-लाखो महाराष्ट्रातच्या लोकांसाठी कामे केली आहेत. सतत तुम्ही त्यांना काही तरी देत आला आहात. कधीतरी आपल्या मनात काय आहे, काय चाललंय किंवा आपलं दु:ख काय आहे, ते कधीतरी शेअर करा. तुमचेही काही टेन्शन असतील ते वाटायला आवडेल. पण, तुम्ही हे आतापर्यंत केले नाही. नेहमी एक चांगला हसरा चेहरा घेऊन आमच्यासमोर आला आहात, तर हीच आमची इच्छा आहे की, आम्हा बहिणींना तुमची दुख:ही काही असतील छोटी-मोठी ती हलकी करायची आम्हाला संधी मिळाली तर बरं होईल."

असं म्हणत अजित दादांनी मोकळ हसत खेळत बोलावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.. त्या लोकमतशी बोलत होत्या.

Updated : 3 Aug 2020 6:26 AM GMT
Next Story
Share it
Top