Home > News Update > हैदराबाद एन्काउंटर : असाच न्याय देशातील प्रत्येक पीडितेला न्याय मिळावा – तृप्ती देसाई

हैदराबाद एन्काउंटर : असाच न्याय देशातील प्रत्येक पीडितेला न्याय मिळावा – तृप्ती देसाई

हैदराबाद एन्काउंटर : असाच न्याय देशातील प्रत्येक पीडितेला न्याय मिळावा – तृप्ती देसाई
X

हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला जाळून ठार करण्यात आलं होतं. या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आरोप असलेल्या या चारही आरोपींचं पळून जात असल्याचं कारण देत पोलिसांनी एन्काउंटर केलं आहे.

हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संक्षयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. यावर समाजातील विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हैदराबाद बलात्कार प्रकरणा विरुद्ध भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक होऊन त्यांनी महिला कार्यकर्त्यांसह तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या राहत्या घरासमोर विरोध करत निदर्शनं केली होती.

हे ही वाचा...

हैदराबाद एन्काउंटर : कायद्याचे राज्य आहे का?

PMC Bank Scam : “जसा तेरा खातेदारांचा मृत्यू झाला तसा माझा ही होईल!’’

दुष्काळात चारा निर्मितीचा बलवडी पॅटर्न

त्यानंतर तेलंगना पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, आज सकाळी आलेल्या या वृत्तानंतर त्यांनी मॅक्समहाराष्ट्राला प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला. "हैदराबाद पोलिसांनी जे केलं ते योग्य केलं त्यांच्या या निर्णयाचं मी अभिनंदन करते.

देशात अनेक बलात्कार प्रकरणातील केसी आहेत मात्र यावर अंमलबजावणी होताना दिसत नाही केंद्र सरकारला एक निवेदन आहे की या गुन्हेगारांना ६ महिन्याच्या आतच फाशीची शिक्षा व्हावी हा कायदा होणे गरजेचं आहे. असाच न्याय देशातील प्रत्येक पीडितेला मिळावा."

अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली.

Updated : 6 Dec 2019 10:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top