Home > News Update > सुरतमध्ये शेकडो मजूर रस्त्यावर; प्रमुख वृत्तवाहिन्यांनी असं केलं वार्तांकन

सुरतमध्ये शेकडो मजूर रस्त्यावर; प्रमुख वृत्तवाहिन्यांनी असं केलं वार्तांकन

सुरतमध्ये शेकडो मजूर रस्त्यावर; प्रमुख वृत्तवाहिन्यांनी असं केलं वार्तांकन
X

एबीपी न्यूज

सुरतमध्ये प्रवासी मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केली, अशी बातमी 'एबीपी न्यूज'ने दिली आहे. सरकारने मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था केली, तरीही आक्रमक झालेल्या मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचं एपिबीच्या बातमीत म्हटलंय.

सुरतच्या ग्रामीण भागात टेक्स्टाईल मजूर मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या घरी जाण्यासाठी हे मजूर एकत्र आले आणि दुपारपर्यंत सुमारे ८ हजारांचा जमाव जमला. पोलिसांनी या मजुरांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र, आक्रमक होत मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही लाठीचार्ज करत आणि अश्रूधुराचाही वापर केला.

https://youtu.be/GWFy9UlV00I

एनडीटीव्ही

घरी पाठवण्याच्या मागणीसाठी सुरतमध्ये टेक्स्टाईल मजूर रस्त्यावर आले आहेत अशी बातमी 'एनडीटीव्ही'ने दिली आहे. सुरत परिसरात टेक्स्टाईल युनिट मोठ्या संख्येने आहेत. सध्या हे सर्व कारखाने बंद असल्याने मजुरांना काम नाही. त्यामुळे घरी पाठवा ही मागणी करत मजूर हजारोंच्या संख्येने रस्त्यावर आल्याचं एनडीटीव्हीनं म्हटलंय. सुरतच्या वरेली भागात पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केल्याचं बातमीत सांगण्यात आलंय.

https://youtu.be/EwfBRIA3h6c

इंडिया टुडे

सुरतमध्ये मजुरांनी घरी जाण्याच्या मागणीसाठी आंदोलन केल्याचं 'इंडिया टुडे' या इंग्रजी वृत्तवाहिनीने म्हटलंय. हजारोंच्या संख्येने मजूर रस्त्यावर जमले. काही वेळाने जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी वाहनांची तोडफोड करायला सुरुवात केली. अशावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला असं 'इंडिया टुडे'च्या बातमीत म्हटलंय.

https://youtu.be/cYjsm-wuaKs

न्यूज १८ इंडिया

सुरतमध्ये पोलीस आणि मजूर यांच्यात झडप झाली, अशा आशयाची बातमी हिंदी वृत्तवाहिनी 'न्यूज १८ इंडिया'ने दिली आहे. गुजरातमध्ये मजुरांनी गोंधळ घातला असं न्यूज १८ इंडियाने आपल्या बातमीत म्हटलंय.

घरी जाण्याच्या मागणीसाठी मजूर रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनी अश्रुधाराचा वापर केल्याचं बातमीत सांगण्यात आलंय.

https://youtu.be/MA1Mn7XlBQg

https://youtu.be/rTFpKYGt2pQ

रिपब्लिक टीव्ही

सुरतमध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करत शेकडो मजूर रस्त्यावर आले, अशा आशयाची बातमी 'रिपब्लिक' या इंग्रजी वृत्तवाहिनीने दिली.

उत्तर प्रदेश आणि बिहारचे मजूर घरी जाण्याच्या मागणीसाठी लॉकडाऊनचं उल्लंघन करत रस्त्यावर आले. या मजुरांना बसने उत्तर प्रदेश येथे पाठवण्यात आलं होतं. मात्र, उत्तर प्रदेश सरकारची परवानगी नसल्याने त्यांना राज्यात घेण्यात आलं नाही त्यामुळे या मजुरांना परत बोलावण्यात आलं. त्यामुळे चिडलेल्या मजुरांनी पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली, असं 'रिपब्लिक'च्या बातमीत म्हटलंय.

हे सगळं घडत असतांना एकाही मजुराने सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही आणि मास्क वापरला नाही असंही या बातमीत सांगण्यात आलंय.

https://youtu.be/DbNtcpcICng

Updated : 4 May 2020 1:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top