Home > News Update > गाजर, फेकू, सुपर सीएम, ग्रेट सीएम मुख्यमंत्र्यांच्या लाइव्ह वर काय आहेत प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया

गाजर, फेकू, सुपर सीएम, ग्रेट सीएम मुख्यमंत्र्यांच्या लाइव्ह वर काय आहेत प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया

गाजर, फेकू, सुपर सीएम, ग्रेट सीएम मुख्यमंत्र्यांच्या लाइव्ह वर काय आहेत प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया
X

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या परभणी दौऱ्यात आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ही पत्रकार परिषद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेज वर लाइव्ह दाखवण्यात येत होती. लाइव्ह प्रसारणामध्ये खराब आवाजाची समस्या असली तरी प्रेक्षकांनीही मुख्यमंत्र्यांना बरेच प्रश्न विचारले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या लाइव्ह वरचे महत्वाच्या प्रश्नांचं हे संकलन

- बॉन्डेड नर्सेस चं काय सर? बाँडेड नर्सेस ना कायम करा असा प्रश्न अंजली गरंडवाल यांनी विचारला आहे.

- शैक्षणिक कर्ज माफ करा अशी मागणी तानाजी थोरात यांनी केलीय.

- परभणी-जिंतूर रोड चं काय, असा प्रश्न दत्ता हिंगे यांनी विचारला आहे.

- २०१७-१८ चा सोयाबीन पीक विमा का आला नाही असा प्रश्न दत्तराव काचवे, दैठणा मंडळ, परभणी यांनी विचारला आहे. असाच प्रश्न उत्तम काचवे यांनीही विचारला आहे.

- आपले सरकार संगणक परिचालकांचं सांगा काहीतरी अशी प्रतिक्रीया अमरदीप कुकडे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

- अरे देवेंद्र, बेरोजगारीवर व कर्जमाफीवर बोल अशी प्रतिक्रीया गोविंद पाटील यांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात ऊस लावण्यास बंदी मग शेतकऱ्यांनी गांजा लावावा काय, असा सवाल ही त्यांनी केला आहे.

- दुधाचा भाव काय असा सवाल विनायक शिंदे यांनी विचारला आहे.

- महाराष्ट्राचे कार्यक्षम, जाणते माननिय मुख्यमंत्री साहेब पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाचा आकृतीबंध आपल्याच अखत्यारीत असलेल्या नगरविकास खात्याकडे मान्यतेसाठी असुन आपण त्यास मंजुरी द्यावी ही विनंती! सदर पुणे मनपा शिक्षण विभागातील रोजंदारी सेवक/रखवालदारांना कायम करण्यासाठी आकृतीबंध मान्य होण्याचे सबब सांगीतली जात आहे आपण योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करावी ही सर्व ३७० रोजंदारी कामगारांतर्फे आपणास विनंती. अशी विनंती विवेक शिंदे पाटील यांनी केली आहे.

- अकलूज मधून वेळेवर एकही महामंडळ एसटी जात नाही, दिवाकर रावते यांना खूप तक्रार केली, आपण स्वतः लक्ष द्यावे अशी विनंती शालन जगदाळे यांनी केली आहे.

- परभणी जिल्हायात औद्योगिक धोरणे राबवा, शेती बेभरवशाची झाली आहे, शेतकऱ्यांसाठी सरसकट दीड लाख कर्जमाफी प्रत्यक्ष अंमलात आणावी अशी मागणी उद्धव इंगळे यांनी केली आहे.

- महिलांशी कसं वागायचं हेही कळत नाही का पोलिसांना. पोलीस खात्यात महिला पोलीस नाहीत का, पूजा ताई मोरे पाटील यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा अशी मागणी मोहन कदम यांनी केली आहे.

- साहेब, पारदर्शक कारभार करता आणि सगळीकडे खाजगीकरण करता व सरकारी जागा विकून टाकता. उदाहरणार्थ लातूर क्रीडा संकुल, असा प्रश्न राजू राऊत यांनी विचारला आहे.

- साहेब सर्वच नेते सांगतात की शासनाने कोटी रूपये दिले, पण रस्त्यांचा विकास होत नाही. सर्व नेते कोटींची भाषा करतात पण सामान्य माणसांना त्रास होतो असा प्रश्न सिद्धी गृह उद्योग, औरंगाबाद यांनी विचारला आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/677478702731009/?t=3

या प्रतिक्रियांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांना ग्रेट, सुपर सीए, फेकू, गाजर अशा आशयाच्याही कमेंटस प्रेक्षकांनी पोस्ट केल्या आहेत.

Updated : 30 Aug 2019 6:06 AM GMT
Next Story
Share it
Top