Home > News Update > महाराष्ट्राची फजिती करण्यासाठी जादा रेल्वेगाड्या – अनिल देशमुख

महाराष्ट्राची फजिती करण्यासाठी जादा रेल्वेगाड्या – अनिल देशमुख

महाराष्ट्राची फजिती करण्यासाठी जादा रेल्वेगाड्या – अनिल देशमुख
X

स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्राने पुरेशा ट्रेन दिल्या नाही असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक होत 125 गाड्या सोडण्याची घोषणा केली. पण पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी 26 मेपर्यंत ट्रेन पाठवू नका असं पत्र लिहीलं असतानाही रेल्वेतर्फे महाराष्ट्रासाठी ३४ ट्रेन दिल्या गेल्या. केवळ महाराष्ट्राची फजिती कशी होते हे दाखवण्यासाटी पियुष गोयल यांनी या गाड्या पाठवल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

1 तासात मजुरांची यादी द्या 125 गाड्या देतो असे आव्हान पियुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. पण पश्चिम बंगालमध्ये अम्फन वादळामुळे सध्या गाड्या पाठवू नयेत अशी विनंती कऱणारे पत्र पश्चिम बंगाल सरकारने रेल्वेला पाठवले. तरीही महाराष्ट्रातून पश्चिम बंगालला जाण्यासाठी 34 ट्रेन रेल्वेने दिल्या. जर ट्रेन जाऊ शकणार नाहीयेत तर मग हा गाड्या कशासाठी दिल्या जात आहे असा सवाल अनिल देशमुख यांनी विचारला आहे.

Updated : 27 May 2020 1:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top