Home > News Update > Hinganghat Burning Case : आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली – अजित पवार

Hinganghat Burning Case : आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली – अजित पवार

Hinganghat Burning Case : आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली – अजित पवार
X

हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यातून आणि नंतर मृत्यूमधून आपण वाचवू शकलो नाही. ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे. अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

हिंगणघाट मधील पीडितेचे निधन झाल्यावर तिला श्रध्दांजली वाहताना अजितदादा पवार यांनी यापुढे कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे असंही अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे.

हिंगणघाट घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल असे स्पष्ट संकेत अजितदादा पवार यांनी दिले आहेत.

आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्ल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाटवासियांच्या दुःखात सहभागी आहे. अशा शब्दात आपला शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे.

Updated : 10 Feb 2020 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top