Home > News Update > इराण-अमेरिका संघर्ष, सुलेमानी यांच्या मृत्युनंतरची परिस्थिती- १६ मोठे मुद्दे

इराण-अमेरिका संघर्ष, सुलेमानी यांच्या मृत्युनंतरची परिस्थिती- १६ मोठे मुद्दे

इराण-अमेरिका संघर्ष, सुलेमानी यांच्या मृत्युनंतरची परिस्थिती- १६ मोठे मुद्दे
X

१. कासीम सुलेमानी यांच लोकेशन, त्यांच्या हालचाली संदर्भातली माहिती अमेरिकेला पहिल्यांदाच मिळाली नाही. यापुर्वी बराक ओबामा, जॉर्ज बुश यांच्या कार्यकाळात अमेरिकनं गुप्तचर संस्थानी सुलेमानी यांच्यासंदर्भात माहिती सादर केली.मात्र त्यांनी सुलेमानी यांना ठार करण्याचे आदेश दिले नाहीत.

२. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव सिनेमटध्ये दाखल होणार आहे. ट्रम्प यांनी ही वेळ का निवडली, हा प्रश्न आहेचं. यापूर्वी तत्कालीन अमेरिकनं अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग प्रस्ताव आला असतांना नेमक्या त्याचं काळात त्यांनी इराकमध्ये रॉकेट हल्ले करण्याचे आदेश दिले होते.

३. इराणने यापूर्वी अमेरिकेचं ड्रोन पाडलं, अमेरिकेचे महत्वाचा भागीदार असलेल्या सौदी अरेबियाच्या तेल रिफायनरीवर हल्ला केला. मात्र तरीही ट्रम्प यांनी संयम राखला होता. मात्र यावेळी नेमकं अस काय झालं की त्यांनी हल्याचा आदेश दिला.

४. जनरल सुलेमानी यांच्या हत्येनंतर ट्रम्प यांनी युध्द रोखण्यासाठी हा हल्ला केल्याचं ट्विट केल. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी अमेरिका हल्यासाठी तयार असून, इराणचे ५२ महत्वाचे टार्गेट निश्चित केल्यासंदर्भातील धमकीवजा ट्विट केले. यावरुन ट्रम्प यांना आगीत तेल ओतायचं आहे, असचं दिसून येतंय.

५. एवढा मोठा हल्ला करतांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन कॉँग्रेस किंवा डेमोक्रॅटीक किंवा त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांना विश्वासात घेतलं नसल्याचं स्पष्ट झालंय.

६. अमेरिकेच्या हिताचं रक्षण करण्यासाठी जनरल सुलेमानी यांना ठार केल्याचा निर्णय़ घेतला अस ट्रम्प यांच म्हणणं आहे. मात्र ट्रम्प यांनी वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थापोटी अनेक निर्णय घेतल्याचा एक मोठा इतिहास आहे.

७. सुलेमानी हे अमेरिकेचे शत्रू होते. त्यांनी कट आखून अनेक अमेरिकन नागरिक, जवानांवर हल्ले केले हे सर्व ठिक आहे. मात्र सुलेमानी हे इराणी लष्कराचे कमांडर होते. दुसऱ्या देशाच्या राजकीय नेत्यांची हत्या करण्याचं धोरण सध्यातरी अमेरिका राबवतं नाही. आंतराष्ट्रीय कायद्यानूसार हा युध्दाचा गुन्हा ठरतो. शिवाय अमेरिकेचा ड्रोन कार्यक्रम वादग्रस्त ठरला आहे.

८. जनरल सुलेमानी हे अमेरिकन जवानाविरोधात मोठ्य़ा हल्याची योजना आखत असल्यामुळे त्यांची हत्या केल्याचा युक्तिवाद अमेरिकेच्या अध्यक्षांनी केलाय. मात्र तो युक्तिवाद अनेकांच्या पचनी पडलेला नाही. शेवटी जनरल कासीम हे एका व्यवस्थेचे भाग होते. त्यांच्या जागी दुसऱा व्यक्ती आल्यामुळे इराणचं अधिकृत धोरण काही बदलणार नाही.

९. या हल्यानंतर इराकमध्ये कार्यरत असलेल्या सर्व अमेरिकन नागरिकांनी ताबडतोब देश सोडण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिलेत. त्यामुळे सुलेमानी यांच्या हत्येनंतर सुरक्षेचा प्रश्न कमी झाला नसून तो जास्त गंभीर झालाय. ट्र्म्प यांच्या या निर्णयाचे दिर्घकालीन परिणाम होणार असून जगभरात काम करणाऱ्या अमेरिकन नागरिकांना, जवानांना या हत्येची किमंत चूकवावी लागेल अशी चिन्हं आहेत.

१०. ट्रम्प यांनी घाईघाईने ही कारवाई केल्याची माहिती समोर येतेय. अमेरिकन गुप्तचर संस्थानी नेहमीप्रमाणे सुलेमानी यांच्या लोकेशन, हालचालींबद्दल माहिती दिली होती. त्यासोबतचं सुलेमानी यांची हत्या केल्यास त्याचे होणारे परिणाम याची जाणीवही ट्रम्प यांना करुन दिली होती. मात्र ट्रम्प यांनी दुसऱ्या मुद्यावर विचार केलाच नाही.

११. सुलेमानी यांच्या हत्येची तुलना ओसामा बिन लादेन, अबू बक्र अल बगदादी किंवा मुअम्मर गद्दाफी यांच्यासोबत होवू शकत नाही. सुलेमानी इराणचे सर्वोच्च कमांडर होते. शिवाय दुसऱ्या देशाच्या हद्दीत त्यांना ठार केल्यामुळे सार्मभौमत्वाचा मुद्दा निर्माण झालाय. सुलेमानी यांची हत्या ही युद्धाला चिथावणी देण्याचा प्रकार आहे.

१२. अमेरिकेला मध्य आशियातून ताबडतोब बाहेर पडायचं आहे. इराकमध्ये सध्या 5 हजारावर अमेरिकनं सैन्य तैनात आहे तर संपुर्ण आखाती देशामध्ये दिड लाखाच्या जवळपास सैन्य तैनात आहे. मात्र या हत्येमुळे अमेरिकेचे पाय मध्य आशियात अजून खोलवर फसत जाणार आहे. याचा परिणाम अफगाणिस्तान, इराकमध्ये तैनात असलेल्या नाटो देशांच्या (यामध्ये ब्रिटेन, फ्रांस, जर्मनी,ऑस्ट्रेलियासारख्या अनेक देशांचा समावेश आहे) सैनिकांवर थेट होणार आहे. त्यामुळेचं या हल्ल्याची पुर्वसूचना दिली नसल्याची तक्रार ब्रिटेनच्या पंतप्रधानांनी केली आहे.

१३. जनरल सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिकेनं इराकमधून चालतं व्हावं असा प्रस्ताव इराकी संसदेनं मंजूर केला. इराकमधील सर्व प्रकारच्या लष्करी कारवाया अमेरिकेनं ताबडतोब थांबवल्या आहेत. याचा अर्थ सुलेमानी यांना मारल्यानंतर अमेरिका अधिक असुरक्षित झाली. आणि इराकमध्ये अमेरिकेच्या सर्व हालचाली ठप्प झाल्यात. त्यामुळे या हल्यानं नेमकं काय साध्य केलं,हा प्रश्न निर्माण झालाय.

१४. या हल्यामुळे इराणने अणूकरार गुंडाळल्याचं जाहिर केलं. त्यामुळे इराण पुन्हा अण्वस्त्र कार्यक्रम सुरु करणार असल्याचं स्पष्ट झालंय. म्हणजे इराणला अण्वस्त्र निर्मीतीपासून रोखण्याचा अमेरिकेचे उद्देश सुलेमानी याच्या हत्येच्या निर्णयामुळे धुळीस मिळालाय. तर दूसरिकडे उत्तर कोरियासारख्य़ा देशाचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबण्यात अमेरिका अपयशी ठरलाय.

१५. इराक, सिरीया या देशातून आयसिसला पराभूत करण्यात सुलेमानी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र सुलेमानी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर आयसिस पुन्हा एकदा डोक वर काढू शकते. सुलेमानींना ठार केल्यानंतर अमेरिकेनं इसिससोबतचा लढ्याला तात्पुरता विराम दिलाय. इराकमध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती, आयसिससाठी पुन्हा सक्रीय होण्याची सुवर्णसंधी घेवून आली आहे.

१६. अमेरिकेने इराणवर लादलेल्या आर्थिक निर्बंधामुळे इराणची अर्थव्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे बेरोजगारी वाढली, पेट्रोल, गॅसच्या किंमती इराण सरकारने वाढवल्या. इराण सरकार आणि सुलेमानी यांच्याविरोधात जनतेत आक्रोश निर्माण झाला होता. मात्र सुलेमानी यांच्या हत्येनंतर हे चित्र बदललं आहे. त्यामुळे ‘डेथ टू खोमेनी’ नारे देणाऱ्या जनतेनं पुन्हा ‘डेथ टू अमेरिका’ हे नारे द्यायला सुरुवात केली आहे. सुलेमानी यांच्या हत्येनंतर विभागला गेलेला इराण पुन्हा एकत्र आलाय.

Updated : 6 Jan 2020 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top