देशात १ लाखाहून अधिक लोक कोरोनामुक्त

Courtesy: Social Media

गेल्या २४ तासात कोरोनाचे ८ हजार ९०९ नवे रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. याबरोबरच देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ७ हजार ६१५ झाली आहे. पण यापैकी तब्बल १ लाख ३०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५ हजार ८१५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने देशातील कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १ हजार ४९७ आहे.

२४ तासात १ लाख ३७ हजार कोरोना चाचण्या दरम्यान देशात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण आता वाढले असून गेल्या २४ तासात १ लाख ३७ हजार १५८ लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ICMR ने दिली आहे. आतापर्यंत एकूण ४१ लाख ३ हजार ३२३ लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.