#कोरोनाचा कहर : एका दिवसात तब्बल 6 हजार 88 नवे रुग्ण

Courtesy: Social Media

देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या नोंदवली गेली आहे. 24 तासात कोरोनाचे 6 हजार 88 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 447 वर पोहोचली आहे.

तर गेल्या 24 तासात 148 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 583 झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 48 हजार 533 वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात आता कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या 66 हजार 330 आहे.