देशात आतापर्यंत 82 हजार 370 रुग्ण कोरोनामुक्त

देशातले गेल्या 24 तासात कोरोनाबाधीत रुग्णांची विक्रमी संख्या नोंदवली गेली आहे. 24 तासात देशात 7 हजार 964 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 73 हजार 763 झाली आहे. पण या एकूण रुग्णांपैकी 82 हजार 370 कोरोनामुक्त झाल्यामुळे देशातील एक्टिव रुग्णांची संख्या 86 हजार 422 आहे. तर 24 तासात मृतांची संख्या 265ने वाढून 4971 झाली आहे.

देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून ही संख्या आता ६० हजारांच्या वर गेली आहे. पण राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण तामिळनाडू मध्ये आहेत, इथली संख्या सध्या 20 हजार 246 , दिल्ली 17हजार 386, गुजरात – 15 हजार 934 आहे.