Home > News Update > कुर्ल्यातील नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर

कुर्ल्यातील नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर

कुर्ल्यातील नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर
X

कुर्ला येथील मिलनलगर परिसरातील नाल्याच्या दुर्गंधीमुळे झोपडपट्टीतील रहिवासींना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहेत. परिसरातील इमारतीमधील मलनिसारण आणि कचरा या नाल्यातच सोडला जातोय त्यामुळे दुर्गंधी अधिकच वाढली आहे.

महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करुनही समस्यानिवारण होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण आहे. मात्र, नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी या प्रकरणाचं खापर रेल्वे प्रशासनावर फोडलं आहे. “आम्ही जे.सी.बी आणि स्वच्छता कामगार यांच्या साहाय्याने हा कचरा काढतो आणि सतत आम्ही ही गटारं साफ करत असतो. परंतू लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मोठ्या प्रमाणात या गटारामध्ये कचरा वाहून येतो. आम्ही रेल्वे प्रशासनाला वारंवार याबाबत सांगितलं की, त्या जागेवर जाळी बसवावी जेणेकरुण कचरा वाहून पुढे येणार नाही आणि त्याच जागेवर कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल पण रेल्वे प्रशासनाकडून तशी मदत करत नाही.” असं त्यांनी म्हटलं आहे.

कुर्ल्यातील या नागरिकांच्या समस्या नेमकं कोण आणि कधी सोडवणार हा प्रश्न कायम राहतो. पाहा व्हिडीओ..

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2713102885471165/?t=9

Updated : 19 Jan 2020 3:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top