Home > News Update > शाहीन बागमध्ये बुरख्याआडून कोणी काढला व्हिडीओ?

शाहीन बागमध्ये बुरख्याआडून कोणी काढला व्हिडीओ?

शाहीन बागमध्ये बुरख्याआडून कोणी काढला व्हिडीओ?
X

शाहीन बाग येथे आज एका गैर-मुस्लिम युवतीने बुरखा घालून व्हिडीओ बनवण्यावरुन मोठा गोंधळ निर्माण झाला. नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात (CAA) प्रदर्शन करणाऱ्या महिलांचा जमाव या युवतीभोवती गोळा झाला होता. मात्र वेळीच पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत युवतीला महिलांच्या तावडीतुन बाहेर काढलं. काही वेळाने असं समोर आलं की सदर युवतीचं नाव गुंजा कपुर (Goonja Kapoor) आहे. पोलिसांनी या युवतीला ताब्यात घेतलं आहे.

शाहीन बागमध्ये नेमकं काय घडलं?

शाहीन बाग (Shaheen Bagh) येथे सुरु असलेल्या आंदोलनात ही युवती बुरखा घालुन व्हिडीओ बनवत होती. मात्र, तिचा प्रश्न विचारण्याचा सुर योग्य न वाटल्यामुळे महिलांना संशय आला. महिलांनी तिची तपासणी केली असता तिच्याकडे कॅमेरा सापडल्यामुळे हा वाद निर्माण झाला. युवती मुस्लिम नसतानाही बुरखा घालुन आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आली असल्याचं मत महिलांनी मांडलं. प्रदर्शन करणाऱ्या महिलांनी युवतीला घेरुन विचारपुस करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. यामध्ये प्रदर्शनकर्त्या महिला आम्हाला बुरखा घालुन का बदनाम करते आहेस? असा सवाल करत आहेत.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/406260886863737/

कोण आहे गुंजा कपुर ?

गुंजा कपुर ही प्रसिद्ध युट्युबर आणि उजव्या विचारसरणीची राजकीय विश्लेषक आहे. ट्वीटरवर तीचे २४००० फोलोवर्स असुन या माध्यमातुन ती आपल्या राजकीय भुमिका मांडत असते. विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि भाजप नेते तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) गुंजा कपुर हिला फोलो करतात.

भाजप सरकार शाहीन बाग येथील CAA विरोधी आंदोलन मोडून काढण्यासाठी आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी अशा पद्धतीने माणसं पाठवली जातात असं आंदोलनकर्त्या महिलांनी म्हटलं आहे.

Updated : 5 Feb 2020 4:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top