ग्रीन झोन असणाऱ्या ‘या’ जिल्ह्यात कोरोना चे दोन रुग्ण

3377

शासन रेड झोन मध्ये असलेले जिल्हे ऑरेंज झोन मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर ऑरेंज झोन मध्ये असणारे जिल्हे ग्रीन झोन मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, ग्रीन झोन मध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोना चे दोन रुग्ण आढळल्यानं ग्रीन झोन मध्ये असलेला या जिल्ह्यातील लोकांची धाकधुक वाढण्याची चिन्हं आहेत.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावातील महिलेच्या मृत्यूनंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 8 मे रोजी या महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेला दम्याचा त्रास झाल्याने तिला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली आहे.

ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत. त्या भागात जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेसह कंटेन्मेंट प्लॅनच्या कामकाजाला सुरूवात केली आहे. हिवरा तांडा गावासह लगतच्या गावातील वाहतूक थांबवण्यात आली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

आज सकाळी दोन कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने वर्धा ग्रीन झोनच्या बाहेर पडला आहे. यातील एक रूग्ण हा वाशिम जिल्ह्यातून उपचारासाठी वर्ध्यात आला होता. तर आर्वी तालुक्यातील महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील प्रशासनाची चिंता वाढली आहे.