Home > News Update > कोरोनाचे संकट- आषाढी वारीचा पालखी सोहळा होणार?

कोरोनाचे संकट- आषाढी वारीचा पालखी सोहळा होणार?

कोरोनाचे संकट- आषाढी वारीचा पालखी सोहळा होणार?
X

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याचे काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर निर्णय़ घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य सचिव सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील, अभय टिळक, सोपानदेव देवस्थानचे अध्यक्ष गोपाळ गोसावी उपस्थित होते. राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील वारीबाबत निर्णय घेतला जाईल असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थानाचे स्वरूप कसे असावे, याबाबत संबंधितांसह सोलापूर, सातारा आणि पंढरपूरमधील मान्यवरांशी चर्चा केली जाणार आहे. तसंच कोरोनाच्या परिस्थिती पाहता सरकार जो निर्णय घेईल त्याचे स्वागत करण्याची भूमिका ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील आणि देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे यांनी मांडली.

Updated : 16 May 2020 1:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top