अवकाळी पावसाने पिचलेल्या शेतकऱ्याच्या दुःखावर राज्यपालांची ८ हजारांची फुंकर

courtesy - social media

अवकाळी पावसामुळं पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagatsinh koshyari )यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची घोषणा केली आहे.

राज्यपालांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला आणि त्यांच्यासाठी आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. खरीप पिकांसाठी 2 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर ८ हजार आणि फळबागांसाठी २ हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टर १८ हजार रूपयांची मदत आज राज्यपालांनी जाहीर केली आहे.

हे ही वाचा…

पीक विमा कंपन्या कोणाच्या फायद्यासाठी आहेत?

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी भाजपचे नेते शिवतिर्थावर जाणार का?

भाजपच्या कार्यकर्त्यांची राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी

यासोबतच नुकसानग्रस्त भागात शेती कर माफ करण्यात येणार असून नुकसानग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालीन परिक्षा शुल्कात सूट देण्यात आली आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.