Home > News Update > राज्याच्या जनतेसाठी उद्धव ठाकरेंनी घेतला 'हा' मोठा निर्णय

राज्याच्या जनतेसाठी उद्धव ठाकरेंनी घेतला 'हा' मोठा निर्णय

राज्याच्या जनतेसाठी उद्धव ठाकरेंनी घेतला हा मोठा निर्णय
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या एक पाऊल पुढे काम करण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री विभागाकडून मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी या कक्षाच्या स्थापनेतून लाखो लोकांना आरोग्याची सेवा मिळाली आहे. अनेकांचे जीव वाचले.

आता मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आल्यानंतर हीच आरोग्याची सुविधा प्रत्येक जिल्ह्यात सुरू केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात शासनाचा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सुरू करण्याच्या सूचनेला उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला असून यासंदर्भातला जीआर लवकरच निघणार आहे.

शिवसेनेच्या कामामध्ये नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याचे कार्यक्रम असतात ठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली जातात. शाखा शाखांमधून रक्तदान आणि आरोग्याच्या शिबिरांची जनजागृती केली जाते इतकचं नाही तर शिवसेनेकडून महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी त्यावेळी डॉक्टर दीपक सावंत यांचा पुढाकार होता.

आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरवातीला सुरू केला असून त्यांच्याकडे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रस्ताव दिला असून प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय कक्ष सुरू करावा अशी विनंती केली आहे. या विनंतीला क्षणाचाही विलंब न करता उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून लवकरच या संदर्भातला जीआर निघेल.

Updated : 16 Dec 2019 2:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top